skip to content
Friday, May 17, 2024
Homeकोंकणठाणेटीडीआरएफ बळकटीकरणासाठी विशेष समिती साधनसामग्री कमी पडू न देण्याचा आयुक्तांचा निर्णय

टीडीआरएफ बळकटीकरणासाठी विशेष समिती साधनसामग्री कमी पडू न देण्याचा आयुक्तांचा निर्णय

ठाणे : बदलापूर येथे महालक्ष्मी एकक्स्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतकार्यात महत्वाची कामगिरी बजावल्यानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज ठाणे आपत्ती प्रतिसाद दल बळकटीकरणासाठी अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. तसेच उल्लेखनिय कामगिरी बजावल्याबद्दल टीडीआरएफच्या सर्व जवानांचे कौतुक केले. दरम्यान टीडीआरएफ टीमला आवश्यक ती साधनसामग्री देण्याबरोबरच त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही श्री. जयस्वाल यांनी केल्या.

आपत््कालीन परिस्थतीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या धर्तीवर ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) ची स्थापना करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला होता. त्यानंतर या पथकामध्ये राज्य अग्नीशमन प्रशिक्षण केंद्रातील40 प्रशिक्षित जवानांचीनियुक्ती करण्यात आली होती. या जवानांना एनडीआरएफ, सिव्हील डिफेन्स, मुंबई आपत्ती प्रशिक्षण केंद्र आदी ठिकाणी या जवानांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर पुरपरिस्थितीत काय करायला हवे याचेही प्रशिक्षण या जवानांना देण्यात आले आहे.

सद्यस्थितीत उर्वी पार्क येथे या दलाचे मुख्यालय बनविण्यात आले असून त्या ठिकाणी आवश्यक ती साधनसामुग्रीसह एक अँब्युलन्स तैनात करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी टीडीआरएफ बळकटीकरणासाठी अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत केली आहे.

सदर समिती टीडीआरएफच्या जवानांना प्रशिक्षण देणे तसेच या दलासाठी आवश्यक ती साधनसामुग्री पुरविणे आदीविषयी महापालिका आयुक्तांना अहवाल देणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments