Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeकोंकणठाणेधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करणार : आयुक्त जयस्वाल आमदार निरंजन डावखरे...

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करणार : आयुक्त जयस्वाल आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने बैठक

ठाणे : ठाणे शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत महापालिकेने सकारात्मक भूमिका दर्शविली आहे. जुन्या ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी मंजुरीप्रक्रियेतील अडथळे दूर करण्यात येतील, अशी ग्वाही महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी येथे दिली.

कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने, जुन्या ठाणे शहरात धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार डावखरे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, `टीजेएसबी’चे माजी अध्यक्ष विद्याधर वैशंपायन, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी, अमित दातार, महेश बोरकर, केदार बापट आदींसह ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, धोकादायक इमारतीत वास्तव्य करणारे काही नागरिक व विकसकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत धोकादायक इमारतींना टीडीआर मंजूर करण्याबरोबरच पुनर्विकासासाठी विकास आराखड्यात सहा मीटरचे रस्ते नऊ मीटर करण्याच्या महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी लवकर करण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिले. या संदर्भात लवकरच महापालिका प्रशासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करुन कामाला सुरूवात केली जाणार आहे. धोकादायक इमारतींचा लवकर पुनर्विकास होण्यासाठी परवानगीचे शुल्क, स्टेअरकेस प्रिमियम आणि महापालिकेचे शुल्क कमी करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर याबाबत अभ्यास करुन सहानुभुतीने निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

नगरविकास विभागाने मार्चमध्ये इमारतींच्या विकासासाठी लागू केलेली अप्पर सिलिंग ही धोकादायक इमारतींसाठी लागू नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे येत्या काळात ठाणे शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येण्याची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments