Sunday, June 2, 2024
Homeकोंकणठाणेठाणेकर रसिकांनी अनुभवली सुरेल संगीत मैफल

ठाणेकर रसिकांनी अनुभवली सुरेल संगीत मैफल

ठाणे : प्रसिद्ध तबलावादक संतोष आगटे यांच्या वतीने नुकताच सहयोग मंदिर सभागृहात ‘वलय ताल सप्तक ’ हि एक सुरेल संगीत मैफल आयोजित करण्यात आली होती शास्त्रीय संगीत म्हणजे सूर आणि लयीचा मिलाप. मनाच्या कॅनव्हासवर उमटणाऱ्या अमूर्त भावनांना अभिव्यक्त करण्यासाठी शास्त्रीय संगीत हे उत्तम साधन आहे. रसिक असणाऱ्या ठाणेकरांना मनाला तर शास्त्रीय संगीतामुळे नेहमीच उभारी मिळते. प्रसिद्ध तबलावादक संतोष आगटे यांच्या वतीने शास्त्रीय संगीत (फ्युजन) यावर आधारित ‘वलय ताल सप्तक ’ ही एक सुरेल संगीत मैफल नुकताच सहयोग मंदिर सभागृहात सादर केलेल्या शास्त्रीय संगीत फ्युजनची मैफल विलक्षण रंगली. श्रोत्यांचे कान त्यामुळे तृप्त झाले.या मैफलीत संतोष आगटे यांच्या शिष्यांनी तबलावादन सादर केले.

यावेळी मैफलीमध्ये गिटार व बासरीवर प्रमोद अडसूळे आणि अमीन खान यांनी हिंदी गाणी सादर केली. श्रुती साटम,अनुजा मटकर,परेश भालेराव या गायकांनी मलमली तारुण्य,आली हसत,पहिली रात्र,ये जिवलग तसेच अरुण दाते यांचे गाजलेले दिल्या घेतल्या वचनांची शपथ अशी एकपेक्षा एक अजरामर गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले या गीताचा सादरीकरणाला तबलावादक संतोष आगटे यांनी तबल्यावर साथ केली. नगरसेविका प्रतिभा मढवी,भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष डॉ राजेश मढवी,शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते विलास जोशी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments