Monday, June 24, 2024
Homeट्रेंडिंगमुंब्रा प्रभाग समितीतील अनधिकृत स्टॉल, हातगाड्यावर महापालिकेची धडक कारवाई

मुंब्रा प्रभाग समितीतील अनधिकृत स्टॉल, हातगाड्यावर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे(१९): ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाले,हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत मुंब्रा प्रभाग समिती  कार्यक्षेत्रातील जवळपास 32 स्टॉल, २२ ठेले, १४ हातगाड्या, १८ बाकडी तोडण्यात आल्या.

 

     या कारवाई अंतर्गत मुंब्रा स्टेशन परिसर, कादर पॅलेस इद्यादी परिसरातील  32 स्टॉल आज जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले. त्याचबरोबर या परिसरातील २२ ठेले, १४ हातगाड्या,१४ हातगाड्या व १८ बाकडी तोडण्यात आल्या.या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या मालांपैकी ५ गाद्या, 40 ब्लँकेट येऊर येथील विवेकानंद बालकाश्रमातील मुलांना देण्यात आले.

 

    सदरची कारवाई मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या मागर्दर्शनाखाली सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात महापलिकेच्या अतिक्रमण विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. यापुढे ही शहरातील अनधिकृत फेरीवाले,हातगाड्या व  बॅनरवर महापलिकेच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments