Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा दावा योग्य : शरद पवार

शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा दावा योग्य : शरद पवार

Sharad pawar shivsena cm
शिवसेनेला सरकार चालवण्याचा अनुभव आहे. सत्ता वाटपाच्या ५०-५० फॉर्म्युल्या प्रमाणे शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षांसाठी दावा सांगण्यात काहीच चुकीचे नाही. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, १९९० मध्येही शिवसेना-भाजपाने ५०-५० चे सूत्र वापरले होते. त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव असल्याने त्यांनी अशा मागणीवर अडून राहण्यात काहीच चुकीचे नाही, असं पवार म्हणाले. पवारांनी दिलेला हा संदर्भ १९९५-१९९९ काळात शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते. याचीही आठवण करुन दिली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर एकत्र काम केल्याने हे निकाल समोर आल्याचे पवारांनी म्हटले आहे. “काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या सोबतीने काम केले. आमच्या योग्य संवाद होता. सोनिया गांधी यांनी सभा घेतल्या नसल्या तरी राहुल गांधींनी सभा घेतल्या होत्या. मी इथला स्थानिक नेता या नात्याने पुढाकार घेत आघाडीसाठी अनेक सभा घेतल्या होत्या,” असं पवारांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments