Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो आणि राहणार

अजित पवार म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो आणि राहणार

 I'm with NCP and Sharad Pawar ajit pawarमुंबई : ‘मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो आणि आहे’ हे याआधीच सांगितलं आहे. मला पक्षातून काढलं का? त्यामुळं बंड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही तसं कुठे ऐकलं किंवा वाचलंय का? मी राष्ट्रवादीसोबतच आहे आणि शरद पवार हेच आमचे नेते आहेत, असं अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडणार नाही हे स्पष्ट झालं.

अजित पवार यांनी बंड पुकारून शनिवारी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची गुपचूप शपथ घेतली होती. अजित पवार यांच्या बंडामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप पडला होता. पवार कुटुंबात फूट पडल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, अजित पवार यांचं मतपरिवर्तन करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक तऱ्हेने प्रयत्न केले. पवार कुटुंबातील सदस्य आणि पक्षाचे ज्येष्ठ नेतेही त्यांच्या भेटीला गेले होते. अखेर अजित पवार यांचं मन वळवण्यात त्यांना यश आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments