मुंबई : राज्यातील 288 नवर्निवाचीत आमदारांचा शपथविधी सोहळा आज बुधवारी संपन्न झाला. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे यादेखील उपस्थित होत्या.
शपथविधी सोहळ्याची महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे शपथविधीचा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. उध्दव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात येणार आहेत. युपीएच्या घटक पक्षातील सर्वच पक्षांचे नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र, कोण कोण नेते या सोहळ्यासाठी येणार आहेत. याबाबत महाराष्ट्र विकास आघाडीकडून स्पष्ट झालं नाही.