मुंबई : फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ दादरमध्ये काढलेल्या मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते भिडले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे काँग्रेसचा मोर्चा होऊ शकला नाही.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ आज सकाळी दादरमध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं. परंतु यावेळी मनसे कार्यकर्ते तिथे दाखल झाले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर बटाटे फेकून विरोध केला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे काँग्रेसचा मोर्चा होऊ शकला नाही.
जमावबंदी लागू केलीय का? : संजय निरुपम
दरम्यान दादरमधील राड्यानंतर मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी माझ्या घराजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड का? कोणत्या नियमाने त्यांना ताब्यात घेतलं जातंय? जमावबंदी लागू केलीय का? असे सवाल पोलिसांना विचारले आहेत.
To @CPMumbaiPolice Why the party workers r being picked up frm my building premises?Under what rule?Is 144 imposed in my building premises?
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 1, 2017