skip to content
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस बनले महाराष्ट्राचे सेवक; ट्विटरवरून मुख्यमंत्री गायब

देवेंद्र फडणवीस बनले महाराष्ट्राचे सेवक; ट्विटरवरून मुख्यमंत्री गायब

BJP devendra fadnavis change his twitter bio write maharashtra sevak
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलवरून मुख्यमंत्री हे पद हटवून आता महाराष्ट्राचा सेवक असे केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतरच फडणवीस यांनी हे बदल केले. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा कार्यकाळ 8 नोव्हेंबर रोजी संपला. त्याच दिवशी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ट्विटर प्रोफाइलमध्ये महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असा केला होता.

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…

देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी भाषणाच्या शेवट मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं करत होते. मात्र, युतीला बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेनेने साथ सोडल्यामुळे भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करु शकत नाही. त्यामुळे भाजपची गोची झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments