Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रसत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंची भेट : बाळासाहेब थोरात

सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंची भेट : बाळासाहेब थोरात

Uddhav Thackeray meets on establishment of power : Balasaheb Thorat
सत्तास्थापनेबाबत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी भेट घेतली. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे सत्तास्थापण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

या भेटीच्या वेळी उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत, सुभाष देसाई काँग्रेस नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यासह इतर नेते उपस्थितीत होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी नवीन महाशिवआघाडी सत्तास्थापन करणार आहेत. त्यामुळे भेटीगाठींचा सिलसिला जोरात सुरु आहे. काल रात्री उध्दव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात हॉटेल ट्रायडंटमध्ये भेट झाली होती. आज राज्यातील नेत्यांची भेट झाली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र सत्तास्थापन करणार आहेत. त्यामुळे कॉमन मिनीमम प्रोग्रावर चर्चा सुरु आहे. कालच उध्दव ठाकरे यांनी भाजवर तोफ डागली होती. तसेच राष्ट्रपती राजवटीवरून राज्यपालांनाही टोला लगावला होता. आज शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. लवकरच तिन्ही पक्ष सत्तास्थापन करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या नजरा या पक्षांकडे लागल्या आहेत.

नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यातील प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेचा पेच सोडवता न आल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तास्थापण्यावरून वेग आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments