Sunday, May 26, 2024
Homeविदर्भनागपूरनागपुरात भाजप- काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

नागपुरात भाजप- काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

नागपूर : नागपुरात दोन गटांत मध्यरात्री तुफान हाणामारी झाली. यात भाजप आणि काँग्रेस नेत्यांच्या दोन गटातले ८ ते १० जण जखमी झाले आहेत. फटाके वाजवण्याच्या कारणावरुन दोन्ही गटात बचाबाची झाली, त्याचे पर्यवसन हाणामारीत झालं.

नागपूरच्या अजनी परिसरात एका गटातील फटाके फोडत असताना, दुसऱ्या गटातील मुलांनी त्यांना फटाके वाजवण्यासाठी आडवलं. त्याच्यानंतर दोन्ही गटात बाचावाची झाली. या बाचाबाचीचं पर्यवसन हाणामारीत झालं. या घटनेत दोन्ही गटातले ८  ते १० जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी धनतोली पोलिसांनी दोन्ही गटाच्या तक्रारीवरुन परस्पर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

नागपूरमधील भाजपचे नेते ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर मुन्ना यादव यांच्या तक्रारीवरुन काँग्रेसचे स्थानिक नेते मंगल यादव यांच्याविरोधात दंगल घडवण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना अटक करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments