महत्वाचे…
१.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतीदिन २.शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर मोठ्या संख्येने शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी उपस्थिती ३.मुख्यमंत्री,उध्दव ठाकरेंच्या हस्ते वेबसाइटंच लोकार्पण
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने मुंबईत शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर मोठ्या संख्येने शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी येत आहेत. सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपर्यातून शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर गर्दी केली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब बाळासाहेबांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आमदार निलम गोऱ्हे,खासदार संजय राऊत, आदीत्य ठाकरे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, स्मिता ठाकरे, राहुल ठाकरे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिवसंग्रामचे विनायक मेटे, काँग्रेस नेते भाई जगताप, खासदार अनिल देसाई यांनी स्मृतिस्थळी पुष्प अर्पणकरून श्रद्धांजली वाहिली. शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक यांनी आपले एक दिवसाचे मानधन दिले. या मदतनिधीचा दोन कोटींचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त शिवाजी पार्कवर लक्ष्मी कांबळे या वाळू शिल्प कलाकाराने बाळासाहेबांचं वाळू शिल्प साकारून अभिवादन केले.