skip to content
Friday, May 24, 2024
Homeआरोग्यकाम करताना डोळ्यांची काळजी

काम करताना डोळ्यांची काळजी

डोळ्यांची उघडझाप करा

काम करत असताना डोळ्यांची सतत उघडझाप करत राहा. यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येणार नाही. डोळे जळजळण्याची समस्या कमी होईल.

डोळे धुवा
दिवसातून कमीत कमी ४ ते ५ वेळा डोळे थंड पाण्याने धुवा. डोळ्यांचा कोरडेपणा कमी होईल.

व्यायाम
कामाच्या वेळी दिवसातून दोन वेळा डोळ्यांचा व्यायाम करा. पाच मिनिटे डोळ्यांची बुब्बुळे उजव्या आणि डाव्या बाजूला फिरवा.

प्रकाशात काम करा
संगणक किंवा लॅपटॉपवर काम करताना खोलीतील विजेचा दिवा सुरू ठेवा. यामुळे कॉम्प्युटरमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचा डोळ्यांवर कमी परिणाम होईल.

विश्रांती घ्या
संगणकावर किंवा कोणतेही काम करताना दर चाळीस मिनिटांनंतर विश्रांती घ्या. ५ मिनिटे डोळे बंद ठेवा. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होईल.

भरपूर पाणी प्या
जास्त पाणी प्यावं. चेहरा व डोळे यांच्या स्नायूंना आराम मिळणे गरजेचे आहे. पाणी प्यावं, खिडकीतून बाहेर पहावं. हिरवळीकडे पाहणे डोळ्यांसाठी चांगले.

डोळ्यांकडे दुर्लक्ष करू नका
ओलाव्याच्या अभावामुळे डोळ्यांना खाज सुटते. तसेच डोळे लालसर होतात आणि डोळ्याची जळजळ होते. त्यामुळे काम करते केळी डोळ्याकडे दुर्लक्ष करू नये. डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे, खाज सुटणे या समस्या असतील तर डॉक्टरांना भेटा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments