मुंबई: माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. “माघी गणेशोत्सवासाला केवळ पाच दिवस बाकी असताना नऊ फेब्रुवारीला राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यात गणेशमूर्तीची उंची चार फूट आणि मंडपांच्या आकारावर ही निर्बंध घातले. ठाकरे सरकारला गणपती उत्सवाच्या तयारीला किती वेळ लागतो हे माहित नाही का?” असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.
गणेशमुर्ती चार दिवसांत तयार होतात का? नियम आधीच का जाहीर केले नाहीत? आता तयार झालेल्या मुर्त्यांचे काय करायचे? असे प्रश्न आशिष शेलार यांनी विचारले आहेत. कोणीही न मागता बार, पबना रात्री एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मोकळीक देणार आणि हिंदुंच्या गणेशोत्सवात मात्र विघ्न घालणार! सरकार नशा बहाद्दरांचे आहे की,उत्सव प्रेमींचे? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.
गणेशमुर्ती चार दिवसांत तयार होतात का? नियम आधीच का जाहीर केले नाहीत? आता तयार झालेल्या मुर्त्यांचे काय करायचे?
कोणीही न मागता बार, पबना रात्री 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मोकळीक देणार आणि हिंदुंच्या गणेशोत्सवात मात्र विघ्न घालणार!
सरकार नशा बहाद्दरांचे आहे की,उत्सव प्रेमींचे?
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 11, 2021
सरकारने काय म्हटलं आहे
भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
माघी गणेशोत्सव १५ फेब्रुवारी रोजी होत असून करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून उत्सव साजरा करावा. अद्याप करोनाचे सावट पूर्णत: निवळले नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्या सरकारने स्पष्ट केले आहे.
नियम कोणते?

विसर्जनालाही केवळ पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल. शिवाय ज्यांना शक्य असेल त्यांनी घरीच गणेश विसर्जन करावे असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.