skip to content
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रशिवजयंतीसाठी सरकारकडून नियमावली जाहीर

शिवजयंतीसाठी सरकारकडून नियमावली जाहीर

१९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे

मुंबई: राज्यभरात १९ फेब्रुवारीला शिवजंयती साजरी केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही आहे नियमावली
>> छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करा.
>> यंदा गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.
>>सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
>>करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी.

>> महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.
>> फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी.
>>आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments