मुंबई : मुंबईत मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या सज्जावर एक तरुण उभा असून, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना भेटण्याची हा तरुण मागणी करत आहे. तरुणाच्या या प्रकारामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे.
तरुण मंत्रालय इमारतीच्या सज्जावर उभा असल्याने एकच खळबळ उडाली आहे. इमारतीच्या खाली बघ्यांची गर्दी जमली आहे.पोलिसांकडून तरुणाला समजावण्याचे प्रयत्न सरु आहेत. मात्र तरुणाकडून पोलिसांना काहीच प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर तरुण पोहोचला कसा, हा प्रश्नही उपस्थित होतं.