महत्वाचे….
१. बी.एससी आणि बी.कॉमच्या विद्यार्थ्यांनी गोदामात जमिनीवर बसून सोडवले पेपर २. विघार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार ३.परीक्षा विभागाचा हलगर्जीपणा उघडकीस ३. कुलगुरु संबंधितांवर कारवाई करतील का?
औरंगाबाद : मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. विद्यार्थ्यांना गोदामात जमिनिवर बसून पेपर सोडवण्यासाठी बसवण्यात आले होते. शिक्षण विभागचा भोंगळकारभार पुन्हा चव्हाट्यावर आला.
चक्क बी.एससी आणि बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना एका गोदामात आणि तेही जमिनीवर बसून पेपर सोडायला लावण्यात आले. परीक्षा विभागात नियोजनाच्या अभावामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांवर जमिनीवर बसून एका गोदामात पेपर देण्याची वेळ आल्यामुळे पालकांमध्ये तसेच विविध संघटनांमधून चिड व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा नेहमीच वादात असतो. त्यातच आता गोदामात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावल्याची घटना समोर आली आहे. मात्र या प्रकाराकडे कुलगुरु काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.