Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रअमित ठाकरे आणि मिताली बोरुडेंचा सोमवारी साखरपुडा?

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडेंचा सोमवारी साखरपुडा?

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र युवा नेते अमित ठाकरे त्यांची मैत्रिण फॅशन डिझायनर मिताली बोरुडे यांचा सोमवारी साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या साखरपुड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

अमित यांची मिताली ही मैत्रिण आहे. दोघे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमात एकत्र दिसत होते. आता साखरपुडा ऊरकून विवाह बंधनात अडकणार आहे. सोमवारी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मात्र अमितच्या साखरपुड्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे कुटुंबिय येणार की नाही याचीही चर्चा रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments