मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख पंप वाटले. कृषी उत्पन्न ४० हजार कोटींनी वाढलं. त्यामुळे राज्याचा कृषी विकासदर शून्याहून साडे बारा टक्क्यांवर पोहोचला असल्याचा दावा कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत पांडुरुंग फुंडकर यांनी कृषी मंत्रालयाच्या तीन वर्षातील कामाचं सादरीकरण केलं. गेल्या तीन वर्षात कृषीसंबंधी २२ निर्णय घेतले. ३०० पेक्षा अधिक गट स्थापन केले. ४०० कोटींचं बजेट शेतीसाठी आहे, अशी माहिती फुंडकर यांनी दिली. जालना येथे मंजूर झालेलं शिल्ड पार्क रखडलं होतं. त्यालाही या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या शिल्ड पार्कचं काम आता कृषी विभागाकडून केलं जाणार आहे.सेंद्रिय शेतीच्या प्रयोगावर अधिक भर आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदान देण्यात येणार आहे. २० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. उन्नत शेती, समृद्ध शेती योजनेवर भर देण्यात येत आहे, अशी माहिती पांडुरुंग फुंडकर यांनी दिली.
”‘मी लाभार्थी’च्या जाहिराती खोट्या नाहीत”
दरम्यान मी लाभार्थी योजनेच्या जाहिराती खोट्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र या जाहिराती खोट्या नसल्याचा दावा फुंडकर यांनी केला.