skip to content
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रबाप रे.. ६५ फुटाचा 'ख्रिसमस ट्री'

बाप रे.. ६५ फुटाचा ‘ख्रिसमस ट्री’

मुंबई – जगभरात आज ख्रिसमस सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. यानिमित्ताने मुंबईत एक कुटुंबाने आपल्या घराच्या परसबागेत ६५ फुटाचा ख्रिसमस ट्री आकर्षक पद्धतीने उभारला असून हा भारतातील सर्वात उंच ख्रिसमस ट्री असल्याचे बोलले जात आहे. तसेच लोकांच्या आकर्षणाचे केंद्र हा ट्री नाताळाच्या दिवशी बनले आहे. हा ख्रिसमस ट्री पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी होत आहे.

हा ६५ फुटाचा ख्रिसमस ट्री वरळीतील ग्रेस दाल्हना यांनी आपल्या घराच्या अंगणात बनविला असून त्यांनी तो आकर्षक पद्धतीने सजविला आहे. हा उत्साहाचा सण मुंबईतील गिरगाव चौपाटीवरही ख्रिश्चन बांधव सांताक्लॉजच्या टोप्या घालून व एकमेकांना भेटवस्तू देऊन, कॅरल साँग म्हणून साजरा करत आहेत. त्यानंतर या भारतातील सर्वात मोठा म्हणून चर्चिला जात असलेल्या ख्रिसमस ट्री ला भेट देत आहेत. या ख्रिसमस ट्री विषयी बोलाताना ग्रेस डोना म्हणाल्या, की प्रभू येशुंचा जन्मदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा विचार आला. यामुळे घराच्या अंगणातच मोठा ख्रिसमस ट्री बनविण्याचे ठरविले. बघताबघता तो ६५ फुटाचा व आकर्षक पद्धतीन सजविल्याने तो पाहण्यास नागरिकांची गर्दी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments