Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रसंदीप देशपांडेंसह आठ मनसैनिकांची ऑर्थर रोड जेलमध्ये रवानगी

संदीप देशपांडेंसह आठ मनसैनिकांची ऑर्थर रोड जेलमध्ये रवानगी

मुंबई: काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह आठ आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सर्व आरोपींना ऑर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या राडेबाजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( १ डिसेंबर ) रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली होती. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या ८ जणांना पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी २ डिसेंबर रोजी किला कोर्टात उपस्थित केले असता त्यांना ४ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.  आज सोमवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर सर्व आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments