Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रअन्… आदिवसी नृत्यावर सुप्रिया सुळे जेव्हा ताल धरतात!

अन्… आदिवसी नृत्यावर सुप्रिया सुळे जेव्हा ताल धरतात!

वर्धा:राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरात हल्‍लाबोल आंदोलन सुरू आहे. आज हल्‍लाबोल पदयात्रेच्या चौथ्या दिवशी वर्धा जिल्‍ह्यातील भिडी येथून सुरुवात झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कोरकू आदिवासींच्या गादुली सुसुन या पारंपारिक नृत्यावर ताल धरला. 

राष्‍ट्रवादीच्या आजच्या पदयात्रेत मेळघाटातील पारंपरिक नृत्य असणार्‍या गादुली सुसुन या आदिवासी नृत्याचा समावेश करण्यात आला होता. पदयात्रेदरम्यान एक आदिवासी लहान मुलगी पारंपरिक नृत्य करत होती. यावेळी या नृत्याने भारावत खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुलीला कडेवर घेऊन या नृत्यात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत राष्‍ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ याही होत्या.

हल्‍लाबोल आंदोलनाचा चौथा दिवस

राज्य सरकाच्या विरोधात राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी हल्‍लाबोल आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील विविध जिल्‍ह्यांमध्ये या आंदोलनाचे लोण पोहोचले आहे. विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अनिल देशमुख, आमदार विद्या चव्‍हाण यांच्यासह राष्‍ट्रवादीचे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात जिल्‍ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लग्‍नाला जाण्यापूर्वी नवरदेवही पदयात्रेत

भाजप सरकारचा निषेध करत शेतकरीही या पदयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी मडकोना येथील निलेश कोंढरे हा नवरदेव बोहल्यावर उभे राहण्यापूर्वी पदयात्रेत सहभागी झाला होता. यावेळी त्याने अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यासोबत सेल्‍फीही काढला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments