skip to content
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रविलेपार्ले बलात्कार प्रकरणी दोन फरार अटकेत

विलेपार्ले बलात्कार प्रकरणी दोन फरार अटकेत

मुंब: विलेपार्ले येथे व्हिडीओ क्लिप्सचा धाक दाखवून १५ वर्षीय मुलीवर नऊ जणांनी बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आणखी दोन फरार आरोपींना अटक केली. विलेपार्ले पोलिसांनी यापूर्वी नऊपैकी सहा जणांना अटक केली होती. या सर्व आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या मुलीने बलात्काराची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी नऊ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी सहा जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता या सर्वांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी फरार झालेल्या तीन आरोपींचा तपास सुरू करून त्यातील दोघांना अटक केली आहे. अद्याप एक आरोपी फरार असून त्याचाही शोध घेण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments