skip to content
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रमोहन प्रकाश यांनी दूरध्वनीवरून केले पाटील कुटुंबियांचे सांत्वन

मोहन प्रकाश यांनी दूरध्वनीवरून केले पाटील कुटुंबियांचे सांत्वन

मुंबई: धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी संपादित जमिनीचा योग्य मिळत नसल्याने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जे. जे. रूग्णालयात सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांचे फोनवरून सांत्वन केले व काँग्रेस पक्ष या दुःखद प्रसंगी पाटील कुटुंबियांसोबत असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments