Wednesday, May 1, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसरकारकडून ‘हत्या’च!

सरकारकडून ‘हत्या’च!

‘जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही म्हणून ८० वर्षाच्या धर्मा पाटील या शेतकऱ्याला मंत्रालयाच्या दारात विष प्राशन करुन आत्महत्या करावी लागते. या सरकारचा जेवढा धिक्कार केला तितका कमी आहे. वृध्द शेतकरी मंत्रालयात तीन वर्षापासून खेटे घालत होते. कोट्यवधीच्या जमिनीच त्यांना मोबदला मिळत नाही म्हणून आत्महत्या करावी लागले. परंतु ही आत्महत्या नव्हे तर ही ‘सरकारकडून हत्याच’ आहे. ३ वर्षात ३ हजार शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. एजंटगिरी रोखण्यात सरकार असमर्थ ठरलंय’,गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला माणसाचीही किंमत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे’. शेतकऱ्याचा जीव गेला. या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकारला हा कलंक लावणारा प्रकार आहे.  ‘शेतक-यांच्या आक्रोशानेही सरकारला ऐकू येत नसेल तर सरकारला आता ‘चलेजाव’ म्हणण्याची वेळ आली. शेतक-यांचे असे मृत्यू जर मंत्रालयाच्या दारात होत असतील तर असा विकास काय कामाचा. याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरूद्ध ३०२ दाखल करायला हवयं. आता जीव गेल्यानंतर सरकारने वाढीव अनुदान देण्याची घोषणा केली. एका वयोवृद्ध शेतकऱ्याने आपला जीव गमावल्यानंतर सरकारला जाग येते. मग त्यापूर्वी हे सरकार झोपले होते का? मृत्युप्रकरणाची तातडीने चौकशी होऊन संबंधितांविरूद्ध फौजदारी कारवाई सुरू करावी. धुळे जिल्ह्यातील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना तत्कालीन आमदार व एक विद्यमान मंत्री प्रकल्पात गेलेली जमीन खरेदी करतात. आपले राजकीय वजन वापरून तातडीने जमिनीची खातेफोडही करून घेतात. मात्र त्याचवेळी धर्मा पाटील सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रशासनाकडे हेलपाटे मारून अखेर मंत्रालयात विषप्राशन करावे लागते, हे सरकारचे मोठे अपयश आहे. धर्मा पाटील यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी येत्या सात दिवसांत १९९ हेक्टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जर हे काम पूर्वीच केले असते तर त्यांचा जीव गेला नसता. परंतु एवढ सर्व झाल्यांनतरही व सरकारकडून मग्रुरीची भाषा वापरली जात असेल तर ती चीड निर्माण करणारी आहे. सरकारचे मंत्री गरिब शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्त दरात लाटत आहेत. नामदार जयकुमार रावल यांनी जमिनी खरेदी केल्याचे पुरावे समोर आले आहेत. मात्र शेतकऱ्यांना मोबदलाही मिळत नाही. वर्षानुवर्ष हेलपाटे मारावे लागतात. या सरकारला शेतकऱ्यांच्या काळ्या मातीच ज्या मातीतून शेतकरी सोनं उगवंतो आणि त्या पोशिंद्याला आज जीव द्यावा लागतो ही शाहु,फुले आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्राला कलंक लावणारी घटना आहे. गेंड्याच्या कातड्याच सरकारची जी रझाकारी चालू आहे हीच जनता त्यांना निवडणूकीत धडा शिकवेल. हे सरकारने विसरता कामा नये. मात्र त्या वृध्दाचा तडफडून शेवटी मृत्यू झाला त्याचा जीव हे सरकार परत आणून देतील का हाच महत्वाचा प्रश्न अनुत्तरीत राहिल.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments