Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुकेश अंबानींना दणका: अँटिलियाच्या जमिनीचा व्यवहार बेकायदा!

मुकेश अंबानींना दणका: अँटिलियाच्या जमिनीचा व्यवहार बेकायदा!

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेली अँटिलियाइमारत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या दाव्यानुसार अँटिलिया इमारत एका अनाथलायाच्या जागेवर बांधण्यात आली असू ही जमीन अंबानी यांना विकण्यात आली. जमिनीचा हा व्यवहारच बेकायदा असल्याचा दावा वक्फ मंडळाने मुंबई उच्चन्यायालयात केला आहे.

मुंबई उच्चन्यायालयात वक्फ मंडळाने प्रतिज्ञापत्र सादर केले असून यात सीईओंनी अँटिलिया इमारतीच्या जागेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ९ मार्च २००५ रोजी वक्फ मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी जमीनीच्या विक्रीला देण्यात आलेली मंजूरी बेकायदा होती, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यापूर्वी २१ जुलै २०१७ रोजी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांच्या खंडपीठाने धर्मादाय आयुक्तांच्या भूमिकेवर घेतलेल्या आक्षेपाबद्दल वक्फ मंडळाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले होते.

अंबानींच्या ‘अँटिलिया’ इमारतीवर कारवाईचे संकेत

अल्पसंख्याक विभागाचे संयुक्त सचिव आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी संदेश तडवी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अँटिलियाची जमीन करीमभाई इब्राहिम खोजा अनाथालयाच्या मालकीची होती. अनाथालयाच्या ट्रस्टकडून अँटिलिया कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने ही जमीन त्यावेळी अवघ्या २१.०५ कोटी रूपयांना विकत घेतली होती. त्यावेळच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत ५० कोटी इतकी होती. याशिवाय, खरेदी व्यवहारासाठी वक्फ मंडळाच्या मंजूरीची गरज होती. त्यासाठी वक्फ मंडळाच्या दोन तृतीयांश सभासदांनी याला अनुमती देणे गरजेचे होते. मात्र, या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन झाल्याचे वक्फ मंडळाचे म्हणणे आहे. ७ डिसेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments