Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेने मुंबई काँग्रेस कार्यालय फोडले

मनसेने मुंबई काँग्रेस कार्यालय फोडले

महत्वाचे…
१. पोलिसांनी कारवाई केली नाही तर प्रत्युत्तर दिले जाईल २. पोलिस स्टेशन पासून २५ मिटरवर काँग्रेस कार्यालय असतांना हल्ला झाला कसा ३. मनसेने हल्याची जवाबदारी स्वीकारली


मुंबई :मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस व मनसेमध्ये सुरू झालेला वाद आणखी चिघळला आहे. विक्रोळी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर आज मनसेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली आहे. त्यात कार्यालयाचं मोठं नुकसान झालं आहे. या प्रकरणी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

आझाद मैदानाजवळ मुंबई काँग्रेसचं हे कार्यालय आहे. मनसेचे काही कार्यकर्ते सकाळच्या सुमारास तिथं घुसले आणि त्यांनी कार्यालयात तोडफोड केली. तेथील साहित्याची प्रचंड नासधूस केली. तिथं उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मात्र कुणीही हात लावला नाही. हल्ल्यानंतर हे कार्यकर्ते तिथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस काँग्रेस कार्यालयात पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

एलफिन्स्टन दुर्घटेननंतर मनसेनं मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांविरोधात मोहीम उघडली आहे. मनसेच्या या भूमिकेला विरोध करत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतली आहे. त्यामुळं मनसे व काँग्रेस आमनेसामने उभी ठाकली आहे. एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करणे व सभा उधळणे असे प्रकार सुरू आहेत. हा वाद शांत झाल्याचं वाटत असतानाच काही दिवसांपूर्वी मराठी पाट्यांचा आग्रह धरणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर विक्रोळी येथे जीवघेणा हल्ला झाला. त्यामुळं मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यातच ‘मनसेचे गुंड सुधारले नाहीत तर त्यांच्यावर असेच हल्ले होणार’ असं ट्विट संजय निरुपम यांनी केल्यामुळं आगीत तेल ओतलं गेलं. त्याचीच परिणती काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यात झाल्याचं बोललं जात आहे.

मनसेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘संजय निरुपमच्या कार्यालयावर मनसेचा हा सर्जिकल होता. इट का जवाब पत्थर से मिलेगा…’ असं ट्विट मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

काँग्रेसकडून निषेध

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ‘विचारांची लढाई विचारानंच लढली पाहिजे,’ असं चव्हाण म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments