Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeकोंकणठाणेमध्य रेल्वेच्या कसारा लाईनवर गुरुवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या कसारा लाईनवर गुरुवारी मेगाब्लॉक

ठाणे – मध्य रेल्वेच्या कसारा लाईनवर गुरुवारी मेगाब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक कल्याण जवळील आंबिवली स्थानक ते आसनगाव स्थानकादरम्यान असून सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत असणार आहे.

आंबिवली स्थानकात मोठा पादचारी पूल बांधण्यात येणार असल्याने हा ब्लॉक होणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. या मेगाब्लॉकदरम्यान सकाळी ९.१२ ते १३.३० यावेळेत सीएसएमटीहून टीटवाळा, आसनगाव, कसाराकरता असणाऱ्या उपनगरिय सेवा आणि ९.५४ ते १५.०२ यावेळेत  टीटवाळा, आसनगाव, कसारा येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उपनगरिय सेवा बंद राहतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments