Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेच्या बंगल्यावर डीएसकेंनी अजित पवारांची घेतली भेट!

धनंजय मुंडेच्या बंगल्यावर डीएसकेंनी अजित पवारांची घेतली भेट!

मुंबई: बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये भरण्यासाठी अखेरची संधी देऊनही त्यांनी न्यायालयात रक्कम जमा न केल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. सोमवारी हायकोर्टात यावर सुनावणी झाली होती. यानंतर आता बांधकाम व्यावसायिक डी.एस कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीला गेल्याचं समजतं आहे. मंगळवारी सकाळी डीएसकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली.  धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन डीएसकेंनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

डी.एस कुलकर्णी व अजित पवार यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. आर्थिक संकटात सापडलेल्या डीएसकेंनी अजित पवार यांच्याशी आर्थिक संकटातून कसं बाहेर पडावं? याबद्दलची विचारणा केल्याचं समजतं आहे. त्यामुळे डीएसके व अजित पवार यांची भेट पुढे काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments