Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रजिया खान आत्महत्या प्रकरणी सुरजच्या याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार

जिया खान आत्महत्या प्रकरणी सुरजच्या याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार

मुंबई: जिया खान आत्महत्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सुरज पांचोलीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला. दुसऱ्या खंडपीठासमोर जाण्याचे सूरजला न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी आदेश दिले आहेत.

जिया खान आत्महत्या प्रकरणी सेशन्स कोर्टात सुरु असलेला खटला जलदगतीने चालवून निकाल लावण्यात यावा, अशी सुरज पांचोलीने याचिका केली आहे. त्यावर आज सुनावणीस हायकोर्टाने नकार दिला.

सुरजवर आरोप निश्चित
३० जानेवारी २०१८ रोजी जिया खान मृत्यूप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीवर आरोप निश्चित करण्यात आले होते. कलम ३०६ प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सुरजवर आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र सुरजने त्यावेळी कोर्टात त्याच्यावरील आरोप फेटाळले. तसेच या संपूर्ण प्रकरणी आपण निर्दोष असल्याचं त्यानं कोर्टाला सांगितलं होतं.

जियाची आत्महत्या
३ जून २०१३ रोजी जिया खानने जुहू येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी २ जुलै रोजी जियाचा कथित प्रियकर सुरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या काही दिवसातच मुंबई हायकोर्टाने सुरजला जामीन मंजूर केला होता.
त्यानंतर जिया खानची आई राबिया खानने सुरज पांचोलीवर जियाची हत्या केल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल केली.
२०१४ मध्ये मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. सीबीआयने सुरजवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं आरोपपत्र दाखल केले होते. ते आरोप ३० जानेवारी २०१८ रोजी निश्चित झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments