Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनमार्चमध्ये कपिलची विनोदी फटकेबाजी

मार्चमध्ये कपिलची विनोदी फटकेबाजी

कॉमेडियन कपिल शर्मासाठी मागील वर्ष फार काही विशेष नव्हतं. सहकलाकारांसोबत झालेल्या वादानंतर छोट्या पडद्यावर त्याचा गाजलेला कॉमेडी शो बंद झाला. त्याचा दुसरा चित्रपट ‘फिरंगी’ बॉक्स ऑफिसवर आपटला. नैराश्यामुळे कपिल व्यसनाधीनही झाला होता. पण आता नवीन वर्षात तो पुन्हा एकदा दणक्यात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. सोनी टीव्हीवर त्याचा शो लवकरच येत असून त्याच्या प्रोमोचे शूटिंग होणार आहे.

कपिल आणि सोनी टीव्ही यांच्यात नव्या शोविषयी चर्चा झाली. त्याच्या कमबॅकबद्दल प्रेक्षकांना माहिती द्यावी यासाठी हा प्रोमो शूट करण्यात येणार आहे. मार्चमध्ये हा शो सुरु असल्याचीही माहिती समोर येत आहे. कपिल आणि त्याचा सहकलाकार सुनील ग्रोवर यांच्यातील वाद जगजाहीर आहे. हा वाद अद्याप मिटला नसल्याने नव्या शोमध्ये सुनीलच्या चाहत्यांची निराशा होणार आहे. कारण सुनील या शोमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही. तर शोमधील जुने कलाकार नव्या शोमध्ये कपिलसोबत सहभागी होणार असून काही नव्या कलाकारांचाही समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे शोचे नाव काय असणार आहे, हेसुद्धा अद्याप निश्चित झाले नाही.प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी कपिल सज्ज झाला असून त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments