मुंबई – मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बेहरामपाडयातील झोपडपट्टीला भीषण आग लागली. अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू असतानाच झोपडपट्टीतल्या पाठोपाठ ४ सिलेंडरचे स्फोट झाल्यामुळे आजुबाजूच्या परीसरात आग भडकण्याची शक्यता निर्माण झालीय. आग आटोक्यात आण्यासाठी अग्निशामक दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आगीने रौद्ररुप धारण केले असून, तिकिट काऊंटरपर्यंत ही आग पसरली आहे. अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु असताना ही आग लागली.
अग्निशमन दलाच्या बारा गाडया घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लांबून धुराचे लोट आकाशात जातान दिसत आहेत. महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याचे काम सुरु असताना ही आग भडकली. बेहरामपाडयामध्ये झोपडपट्टीला आग लागण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा इथे झोपडपट्टीला आग लागली आहे. या परिसरात अनधिकृत बांधकाम मोठया प्रमाणावर असून अनेक झोपडया वांद्रे रेल्वे स्टेशनला लागून आहेत.
एका सिलिंडरला आग लागली. महत्त्वाचं म्हणजे, ही आग वांद्रे पूर्व स्टेशनच्या तिकीटघरापर्यंत पोहचली. मुंबईतल्या वांद्रे पूर्वच्या तिकीट खिडकीला आग लागलीय.अतिक्रिमणविरोधी कारवाई करताना ही दुर्घटना घडली. महापालिकेनं तिकीट खिडकीच्या खाली अनेक झोपडया उभारण्यात आल्या आहेत. ते हटवताना एका झोपडीतल्या सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचं समजतंय. आग विझवण्यासाठी अग्निशमनदलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.