Friday, September 13, 2024
Homeमहाराष्ट्रमनपा आयुक्त आणि महापौरांमध्ये खडाजंगी!

मनपा आयुक्त आणि महापौरांमध्ये खडाजंगी!

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकाचे महापौर आणि महापालिकेच्या आयुक्तांमध्ये वादाचा पुन्हा भडका उडला आहे. भाजपच्या आमदाराचे ऐकून काँग्रेसची सत्ता असलेली महापालिका बदनाम करण्याचे आयुक्त काम करतात, असा आरोप महापौरांनी केला आहे.

महापालिका आयुक्तांनी आयुक्तांनी जाणीवपूर्वक शहरातील प्रश्न रखडवल्याची देखील महापौरांची टीका केली आहे. आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याचा इशाराही महापौरांनी दिला आहे. महापालिकेच्या निवडणुका देखील तोंडावर आल्याने या आरोपांना आता महत्व प्राप्त झाले आहे.

आयुक्तांनी भाजपच्या आमदाराचे ऐकून शहरातील रस्ते, पाणी पुरवठा योजना, ड्रेनेज योजनाची कामे रखडवली असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. महापालिकेतील काँगेसची सत्ता घालवण्यासाठी आणि महापालिकेला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठीच  आयुक्त अशा पद्धतीने काम करतात, असा गंभीर आरोपही महापौरांनी केला आहे.

येत्या १० तारखेपर्यंत रखडवलेल्या कामांना आयुक्तांनी परवानगी दिली नाही, तर आयुक्तांना सुट्टी नाही, असा इशारा देत महापौरांनी आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याची देखील तयारी दर्शवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments