Saturday, July 20, 2024
Homeमहाराष्ट्रदारुच्या ब्रँडला महिलांचं नाव, प्रकरणी महाजनांविरोधात तक्रार

दारुच्या ब्रँडला महिलांचं नाव, प्रकरणी महाजनांविरोधात तक्रार

चंद्रपूर : दारुच्या ब्रँड्सना महिलांची नावं द्या, म्हणजे खप वाढेल, असं विधान करुन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन चांगलेच अडचणीत आले आहेत. चंद्रपुरात महाजनांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दारुबंदी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी गिरीश महाजनांविरोधात चंद्रपुरातील मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महाजनांनी या वक्तव्याद्वारे महिलावर्गाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राज्यातील पाणीटंचाई निवारणाचे प्रयत्न करा, दारुचे मार्केटिंग कन्सल्टन्ट होऊ नका, असं महाजनांना सांगण्यात आलं आहे. गिरीश महाजन यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचंही गोस्वामी म्हणाल्या.

दारुच्या ब्रँडला महिलांचं नाव द्या, खप वाढेल : गिरीश महाजन

साखर कारखान्यानं निर्मित केलेल्या दारुच्या ब्रँडला महिलेचं नाव दिल्यास अधिक खप होईल, असं विधान गिरीश महाजन यांनी केलं. नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. केवळ दारुच नव्हे, तर हल्ली तंबाखू उत्पादनांनाही महिलांचीच नावं दिली जातात, असंही महाजन म्हणाले.

महाजनांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला, मात्र त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीतर्फे गिरीश महाजनांवर कारवाईची मागणी करण्यात आली. नाशिक आणि सोलापुरात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments