Thursday, June 20, 2024
Homeमनोरंजनकपिल शर्मा लवकरच विवाहबंधनात अडकणार?

कपिल शर्मा लवकरच विवाहबंधनात अडकणार?

कॉमेडियन कपिल शर्मा प्रेयसी गिन्नी चत्रथसोबत पुढच्या वर्षी विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. कॉलेजच्या दिवसांपासून कपिल आणि गिन्नी एकमेकांना ओळखतात. मैत्रीपासून सुरुवात झालेल्या या नात्याचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले. आता या नात्याला एक पाऊल पुढे नेत कपिल आणि गिन्नी विवाहबद्ध व्हावे अशी दोघांच्याही कुटुंबीयांची इच्छा आहे.  कपिल व्यसनमुक्त झाल्यावरच त्याच्यासोबत लग्न करेन असे गिन्नीचे म्हणणे आहे. कपिल यासाठी बंगळुरू येथील व्यसनमुक्ती केंद्रातही उपचार घेत होता. गिन्नीचे म्हणणे ऐकून त्याने दारू पिणे सोडले आहे. त्याच्या आगामी फिरंगीया चित्रपटाच्या प्रदर्शनासाठीही तो सज्ज असल्याचे म्हणत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी हे दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘लग्नासाठी दोन्ही कुटुंबीयांकडून कपिल आणि गिन्नीवर दबाव टाकला जात आहे. त्यांनी लवकरात लवकर विवाहबद्ध व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. कपिलच्या आईला गिन्नी पसंत आहे. पण गिन्नीने व्यसनमुक्त होण्याची अट कपिलसमोर ठेवली होती.’

नुकताच कपिल गिन्नीसोबत शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी गेला होता. त्याचा ‘फिरंगी’ हा दुसरा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्यास दोघे शिर्डीला गेले होते. काही दिवसांपूर्वी कपिल आणि गिन्नी यांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत होत्या. पण कपिलच्या जवळच्या मित्राने या फक्त अफवा असल्याचे म्हटले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments