Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशकनिमोळींच्या सुटकेमुळे आनंद, न्याय मिळाला - सुप्रिया सुळें

कनिमोळींच्या सुटकेमुळे आनंद, न्याय मिळाला – सुप्रिया सुळें

नवी दिल्ली – १ लाख ७६ हजार कोटी रुपयांच्या 2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातील माजी दूरसंचार मंत्री ए. राजा व कनिमोळी यांच्यासहीत सर्वा आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयानं हा निर्णय दिल्यानं काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.  दरम्यान, कोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त करणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 

‘माझी मैत्रिणी कनिमोळी यांच्या सुटकेमुळे आनंद झाला आहे. न्याय मिळाला”, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 2 जी स्पेक्ट्रम व्यवहारावर कॅगने आपल्या अहवालातून ताशेरे ओढल्यानंतर २०१० साली हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला होता. पारदर्शक निविद प्रक्रियेशिवाय ए. राजा यांच्या दूरसंचार मंत्रालयाने 2 जी स्पेक्ट्रमच्या १२२ परवान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे सरकारी तिजोरीचे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता.२ फेब्रुवारी २०१२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने सर्व परवाने रद्द केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments