Sunday, September 15, 2024
Homeदेशवादांचे दुसरे नाव म्हणजे कमल हासन!

वादांचे दुसरे नाव म्हणजे कमल हासन!

बॉलिवूड व साऊथ सुपरस्टार कमल हासन याचा आज (७ नोव्हेंबर) वाढदिवस. सध्या कमल त्याच्या ‘विश्वरूपम2  ’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण खरे सांगायचे तर कमल कायम चर्चेत असतो. वादांचे दुसरे नाव, असे त्याच्याबद्दल म्हटले तर ते खोटे होणार नाही. प्रत्येक मुद्यावर बेधडक बोलणारा अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. राजकारणापासून तर हिंदू दहशतवादापर्यंत बोललायं आणि यामुळे वादात सापडलायं. कमलने ओढवून घेतलेल्या वादांवर एक नजर.

सध्या कमल हासन हिंदू दहशतवादावरील त्याच्या लेखामुळे वादात सापडला आहे.  हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, असे कुणीही म्हणू शकत नाही. लोकांची ‘सत्यमेव जयते’वरची आस्था संपलीय. उजव्या विचारसरणीने आता ‘मसल पावर’चा वापर करण्यास सुरूवात केली आहे. हिंसाचारात त्यांचा सहभाग असून, हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला असल्याची टीका त्याने तामिळ साप्ताहिक ‘आनंदा विकटन’मध्ये लिहिलेल्या लेखातून अलीकडे केली. यावरून कमलचा सर्वत्र निषेध होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कमल असे काही बरळत असल्याची टीका भाजपाने केली आहे.

कमल हासनच्या ‘विश्वरूपम’ या चित्रपटावरून मोठा वाद झाला होता. मुस्लिम संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला होता. चित्रपटातील सात वादग्रस्त दृश्ये गाळण्यात आल्यानंतर हा चित्रपट रिलीज झाला होता.
कमलने अलीकडे राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मी नवा राजकीय पक्ष गठीत करणार व राजकारणात उतरणार, असे त्याने म्हटलेय. अलीकडे रिलीज झालेल्या ‘मेरसल’ या तामिळ चित्रपटाशी संबंधित जीएसटी वादावरही कमल हासन बोलला होता. टीकाकारांना शांत बसवू नका. लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्याल, तेव्हाच देश चमकेल, असे कमल म्हणाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्याने पंगा घेतला होता. आधी कमलने नोटबंदीचे समर्थन केले होते. पण नंतर नोटबंदीचे समर्थन केल्याबद्दल मोदींची माफी मागितली होती. मी घाईघाईत नोटबंदीचे समर्थन केले. यासाठी मी माफी मागतो. प्लान चांगला असला तरी त्याची अमलबजावणी चुकलीय. पीएम यासाठी माफी मागणार असतील तर मी त्यांना सलाम ठोकेल, असेत्यांनी लिहिले होते.

जलीकट्टूवरील (तामिळनाडूत खेळला जाणारा बैलांचा पारंपरिक खेळ) बंदीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला त्याने जाहिर विरोध केला होता. अ‍ॅनिमल अ‍ॅक्टिव्हिस्ट जलीकट्टूमुळे इतके दु:खी असतील तर त्यांनी बिर्यानी पण बॅन करावी, असे त्याने म्हटले होते.

महाभारत या धार्मिक ग्रंथावरही त्याने टीका केली होती. ‘देशात आजही एक असा धार्मिक ग्रंथ वाचला जातो, ज्यात एका महिलेला डावावर लावले गेले,’ असे तो म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तामिळनाडूच्या एका न्यायालयात याप्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला होता.

अलीकडे कमलने ‘बिग बॉस’चे तामिळ व्हर्जन होस्ट केले होते. लोकांनी या शोचा निषेध करत कमलवर तामिळ संस्कृती दूषित करण्याचा आरोप केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments