Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeदेशभारताला राहुल सारख्या नेत्याची गरज, तेच पुढचे पंतप्रधान बनतील - सुधींद्र कुलकर्णी

भारताला राहुल सारख्या नेत्याची गरज, तेच पुढचे पंतप्रधान बनतील – सुधींद्र कुलकर्णी

नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे माजी सहकारी सुधींद्र कुलकर्णी यांनी काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रशंसा केली आहे. भारताला त्यांच्या सारख्या नेत्याची गरज असून तेच देशाचे पुढचे पंतप्रधान असतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देताना कुलकर्णी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘आता माझी खात्री झाली आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच देशाचे पुढील पंतप्रधान बनतील आणि त्यांनी बनायला देखील हवे. एका नव्या नेत्याचा उदय झाला आहे.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments