Friday, July 19, 2024
Homeदेशगुजरातला २३ वर्षीय तरुणाची नाही तर २३ वर्षांत केलेल्या कामांची सीडी हवी'

गुजरातला २३ वर्षीय तरुणाची नाही तर २३ वर्षांत केलेल्या कामांची सीडी हवी’

गांधीनगर – गुजरातच्या जनतेला एका २३ वर्षीय तरुणाचा नाही तर २३ वर्षात केलेल्या विकास कामांचा व्हिडिओ पाहायचा आहे, अशा शब्दात पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने भाजपवर हल्ला चढवला. एवढेच नाही, तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओ प्रकरणी मनसातील रॅलीकडे सगळ्यांचे लक्ष लागले. महत्वाचे म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे मनसा येथील रहिवासी आहेत.

हार्दिक पटेल हा गेल्या २ वर्षांपासून पाटिदार समाजाच्या आरक्षणासाठी सरकारविरोधी लढा देत आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपविरोधात पाटिदार समाज मैदानात उतरणार आहे. पाटिदार समाजाने मनसा येथे रॅली काढण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, गांधीनगर पोलिसांनी त्यास नकार दिला.
हार्दिक पटेल म्हणाला,  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीडीचा माझ्या रॅलीला फायदाच होणार आहे. त्या कथित सीडीमुळे मनसा रॅलीत ५० हजार पटेल जास्त जमा होतील, असा टोला त्याने भाजपला लगावला.  भाजप सध्या सीडीचा खेळ खेळत आहे. पण, गुजरातच्या जनतेला २३ वर्षीय तरुणाची नाही तर २३ वर्षात झालेल्या विकास कामांची सीडी हवी आहे.

मनसा ही तीच जागा आहे जेथे २२ जुलै २०१५ रोजी पाटिदार समाजाच्या लोकांसह रॅली करत हार्दिक पटेलने ओबीसी  कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments