Saturday, October 12, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादऑनलाईन प्रकियेवरुन शेतकऱ्याने सदाभाऊंना सुनावले

ऑनलाईन प्रकियेवरुन शेतकऱ्याने सदाभाऊंना सुनावले

औरंगाबाद – राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या ऑनलाईन प्रक्रियेवरून शेतकरी संतप्त झाले आहेत. कर्जमाफी हवी असेल तर ऑनलाईन अर्ज करा, बोंडअळीची लागण झाली की ऑनलाईन अर्ज करा, वीजेच्या जोडणीसाठीही ऑनलाईन अर्ज करा, या ऑनलाइन अर्जामुळेच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात एका शेतकऱ्याने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सुनावले.

सदाभाऊ खोत यांनी शनिवारी शहरात एक आढावा बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी शहराजवळ असलेल्या बाळापूर शिवारात सदाभाऊंनी एका कापसाच्या शेतीस भेट दिली असता,  तेथील शेतकऱ्यांनी हमीभावासह कर्जमाफी, भारनियमन आशा विषयावर प्रश्न विचारले. कापसावरील बोंडअळी, विजेचे भारनियमन, हमीभाव याबाबतच्या समस्या त्यांना सांगितल्या.

या शेत भेटीवेळी एरव्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे वीज वितरण अधिकारी, कृषी अधिकारी, असा लवाजमा सदाभाऊंसोबत उपस्थित होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना कापूस पिकांवरील बोडअळीची समस्या सांगितल्यास कोणताही अधिकारी भेट देण्यास येत नाही. किमान झालेल्या नुकसानीची पाहणी तरी करायला हवी होती. मात्र, हे अधिकारी फक्त मंत्री आल्यावरच फिरकतात बाकीच्या समस्यांवर ऑनलाईन अर्ज करायला सांगतात. आम्ही काय आत्महत्या करायची का ? असा परखड सवाल करत बाळापूर येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी सदाभाऊ खोत यांना सुनावले. त्यावेळी शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन सदाभाऊ खोत यांनी शांत बसने पसंत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments