वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिलरी क्लिंटन यांच्यावर जहरी टीका केली आहे. क्लिंटन या सर्वकालीन अपयशी नेत्या आहेत, अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे. तसेच क्लिंटन यांनी आता आपल्या जीवनात पुढाकार घेऊन ३ वर्षांत आणखी प्रयत्न करावा, असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे.
ट्रम्प यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाची जबाबदारी स्वीकारण्यात ते अपयशी ठरल्याचा आरोप क्लिंटन यांनी केला होता. त्याला उत्तर देताना ट्रम्प यांनी हे ट्विट केले आहे. न्यूयॉर्क रेडिओ स्टेशनला दिलेल्या मुलाखतीत क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर वेगवेगळ्या महिलांनी केलेल्या लैगिक अत्याचारावरून ट्रम्प यांच्यावर आरोप केले होते.