Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeदेशगोरेपणासाठी मोदी दररोज ४ लाखांचे मशरुम खातात- अल्पेश ठाकोर

गोरेपणासाठी मोदी दररोज ४ लाखांचे मशरुम खातात- अल्पेश ठाकोर

महत्वाचे…
१.एका मशरूमची किंमत ८० हजार रूपये २. गुजरातमधील संभाव्य पराभवाने पंतप्रधान बिथरले ३. पाकिस्तानला विनानिमंत्रण गेला होता, हे मोदींनी विसरू नये


गुजरात: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसमध्ये सामील झालेले ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी मंगळवारी एका जाहीर सभेत विधान केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्वचेचा रंग माझ्याप्रमाणेच काळा आहे. मात्र, ते रोजच्या आहारात तैवानवरून आणलेले मशरूम खातात. या एका मशरूमची किंमत ८० हजार रूपये इतकी आहे. पंतप्रधान मोदी दररोज असे पाच मशरूम खातात. त्यामुळेच ते गोरे दिसतात, असे वक्तव्य अल्पेश ठाकोर यांनी केले. आता भाजप अल्पेश यांना काय उत्तर देणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

गुजरातमधील संभाव्य पराभवाने पंतप्रधान बिथरले

स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधानच खोटारडेपणा करीत असल्याच्या कृतीने मला धक्का बसला, वेदना झाल्या. गुजरातमधील संभाव्य पराभवाने पंतप्रधान बिथरल्याचे स्पष्ट दिसते. पण त्यामुळे माजी पंतप्रधान, लष्करप्रमुखांसह सर्वच घटनात्मक पदांचे अवमूल्यन करण्याचा धोकादायक पायंडा मोदी पाडत आहेत, असे सांगून सिंग पुढे म्हणाले, ‘दहशतवादाविरोधात लढण्याचा ज्यांचा इतिहास थिटा आहे, त्यांनी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीयत्वाचे धडे देऊ नयेत. पाकिस्तानला विनानिमंत्रण गेला होता, हे मोदींनी विसरू नये, असा टोला मनमोहन सिंग यांनी मोदींना लगावला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments