Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनरजनिकांतचा कंडक्टर ते सुपरस्टारचा यशाचा प्रवास!

रजनिकांतचा कंडक्टर ते सुपरस्टारचा यशाचा प्रवास!

तामिळ सिनेमांमधले सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. खरं तर रजनीकांत यांचा सिनेमा येणार असं म्हटलं की उत्साहाचं वातावरण तयार व्हायचं. ज्या दिवशी सिनेमा रिलीज होणार त्या दिवशी सगळ्यांना सुट्टीही असायची. इतकंच नाही तर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या फोटोंना दुधाने अंघोळही घातली. लोक त्यांना सुपरस्टार म्हणतात, तर काहींसाठी ते देव आहेत.

सुपरस्टार रजनीकांत यांनी अवघ्या सिनेसृष्टीवर अधिराज्य केलं. त्यांच खरं नाव शिवाजी राव गायकवाड आहे. त्यांना मिळालेली प्रसिद्धी आणि त्यांच खरं आयुष्य यात खूप फरक होता. आजच्या दिवशी म्हणजेच १२ डिसेंबर १९५० ला त्यांचा मराठी कुटुंबात जन्म झाला. आजच्या या खास दिवशी नजर टाकूयात त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर.

– चार बहीण-भावांमध्ये रजनीकांत हे सगळ्यात लहान होते. ते लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा प्रवास खूप खडतर होता.

– त्यांनी सुतारापासून ते हमालापर्यंतची सगळी कामं केली. या सगळ्या कामांमधूनही त्यांचा कल होता तो सिनेमाकडे.

शाळेच्या प्रत्येक नाटकात ते भाग घ्यायचे.

– शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रजनीकांत यांनी बंगळूरू ट्रांसपोर्ट सर्विसमध्ये कंडक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि त्यातूनच ते कन्नड सिनेसृष्टीला जोडले गेले.

– १९७३ मध्ये ते मद्रास फिल्म इंस्टिट्यूटला जोडले गेले. त्यावेळेस त्यांची ओळख निर्माते बालचंद्र यांच्याशी झाली. बालचंद्र यांनी रजनीकांत यांना एक छोटीशी भूमिका करण्याची संधी दिली आणि यातूनच त्यांच्या यशस्वी प्रवासाला सुरूवात झाली.

– १९७५ नंतर रजनीकांत यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले. थलापति (१९९१), अन्नामलाई (१९९२), बाशा (१९९५) आणि पदायाप्पा (१९९९) यांसारख्या सिनेमांनी त्यांनी चाहत्यांची मन जिंकून घेतली. या सिनेमांनंतर ते फक्त अभिनेतेच नाही तर ते सगळ्यांचे रोल मॉडेलही ठरले. त्यांच्या सिनेमांचे डायलॉग्स लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडपाठ असायचे.

२००० साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. त्यानंतर, २००७ मध्ये त्यांचा ‘शिवाजी द बॉस’ तर २०१० सालच्या ‘रोबोट’ या दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर हिट झाले.

पुढच्या वर्षी, त्यांचा सिनेमा ‘२.0’ रिलीज होणार आहे. भारतीय सिनेमात सर्वात महाग सिनेमा म्हणून ओळखला जातोय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments