Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेश'हवा-हवाई' म्हणत काँग्रेसचा नरेंद्र मोदींना टोला

‘हवा-हवाई’ म्हणत काँग्रेसचा नरेंद्र मोदींना टोला

नवी दिल्ली – गुजरात निवडणुकीचा आज अखेरचा दिवस होता. त्यामुळे निवडणूक प्रचार चांगलाच तापला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सी-प्लेनने अम्बाजी मंदिरात दर्शनासाठी गेले. यावरून फिरकी घेताना काँग्रेसने, मोदी प्रवासाला ‘हवा-हवाई’ म्हणत संबोधत सत्ताधाऱ्यांना विकास कळलाच नाही, असे म्हटले आहे.

यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी, सत्ताधाऱ्यांना विकास कळलाच नाही, असे म्हणत, मिस्टर इंडिया या हिंदी चित्रपटाच्या गाण्याचा वापर करत याला ‘हवा-हवाई’, असे म्हटले आहे. अहमदाबाद प्रशासनाने मोदी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोसाठी परवानगी नाकारली होती. यानंतर नरेंद्र मोदी यांनी सी-प्लेनने प्रवास केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments