Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेशदिल्ली सरकारला अस्थिर बनवण्याचा निवडणूक आयोग व मोदींचा कट

दिल्ली सरकारला अस्थिर बनवण्याचा निवडणूक आयोग व मोदींचा कट

AApनवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (आप) निवडणूक आयोगाला पक्षपाती संबोधले. निवडणूक आयोग मोदींसोबत मिळून दिल्लीतील आम आदमी पक्षाला अस्थिर बनवण्याचा कट रचत होते, असा आरोप आपने केला आहे.

आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की आपच्या २० आमदारांना अपात्र ठरवताना आयोगाचे माजी कायदेविषयक सल्लागार एस. के. मेंदिरत्ता यांचे मत लक्षात घेण्यात आले नव्हते.
“निवडणूक आयोग पक्षपाती आहे, हे आता सिद्ध झाले आहे. जर कायदेविषयक सल्लागारांचा सल्ला घेतला जात नसेल तर सल्ला पंतप्रधानांच्या कार्यालयातून आला असेल,” असे भारद्वाज यांनी सांगितले.  आप आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय ज्या निवडणूक आयोग अध्यक्षांच्या काळात देण्यात आला ते मोदींचे निकटवर्तीय होते, असेही भारद्वाज यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments