इंदूर – गुजरातच्या खेडा परिसराजवळ इंदूर-अहमदाबाद हायवेवर सोमवारी रात्री ट्रक आणि जीप यांची धडक झाली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून इतर ६ जण जखमी आहेत. मृतांमधील सर्व मध्यप्रदेशच्या अलीराजपूरचे होते. ते सर्वजण कामाच्या शोधात गुजरातला जात होते.
भरधाव चालली होती जीप..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री २२ जण अलीराजपूरहून अहमदाबादकडे निघाले होते. त्यावेळी जीपचा वेग जास्त असल्याने ती ट्रकवर आदळली आणि हा अपघात घडला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार इंदूर-अहमदाबाद हायवेवर गुजरातच्या कठवाला गावाजवळ समोरून येणारा ट्रक पाहून जीपच्या ड्रायव्हरने टर्न करण्याचा प्रयत्न केला. पण स्पीड जास्त असल्याने नियंत्रण सुटून ती ट्रकवर आदळली.