Saturday, October 5, 2024
Homeदेशबायकोचा धिंगाणा, बालीला जाणारे विमान चेन्नईला वळवले

बायकोचा धिंगाणा, बालीला जाणारे विमान चेन्नईला वळवले

नवी दिल्ली – दोनहा येथून बालीला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या एका विमानात रविवारी नवरा बायकोचे जोरदार भांडण झाले. हे भांडण एवढ्या कडाक्याचे होते, की वैमानिकांवर ते विमान अचानकपणे चेन्नईच्या विमानतळावर उतरवण्याची वेळ आली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे एक इराणी जोडपे आहे. प्रवासादरम्यान संबंधित महिलेचा पती झोपला. यानंतर तिने त्याच्या फिंगर प्रिंटचा वापर करुन त्या मोबाईलचे लॉक उघडले आणि आपला पती आपल्याला फसवत असल्याचे तिच्या लक्षात आले.  यानंतर तिने विमानातच पतीशी जोरदार भांडण करायला सुरूवात केली. त्यामुळे विमानातील काही कर्मचारी तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा तिने या कर्मचाऱ्यांसोबतही असभ्य वर्तन केले. ही सर्व परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर अखेर पायलटने हे विमान चेन्नईकडे वळवण्याचा निर्णय घेतला. यानंतर संबंधित महिलेसह तिच्या पतीला आणि त्यांच्या मुलाला चेन्नईत उतरवले आणि विमान बालीला गेले.
संबंधित कुटुंबाला क्वालालंपूर येथे पाठविण्यात आले असून तेथून त्यांना दोहा येथे पाठवण्यात येणार आहे. यावर कतार एअरवेजने कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments