Placeholder canvas
Sunday, May 12, 2024
Homeदेशराहुल गांधीची ‘खोटी सही’ भाजपाचा डाव फसला!

राहुल गांधीची ‘खोटी सही’ भाजपाचा डाव फसला!

नवी दिल्ली : गुजरातमधील सोमनाथ मंदिराला बुधवारी राहुल गांधींनी भेट दिली. मंदिरात भेट देणाऱ्यांची नोंद करताना राहुल यांनी अहिंदू (Non-Hindu) या रकान्यात सही केली असा आरोप भाजपाने केला. ती सही खोटी असल्याचा डाव काँग्रेसने उधळून लावला. भाजपाकडून खोट्या रजिस्टरमध्ये नोंदीपुढे राहुल यांची सही  केल्याचे काँग्रेसने पत्रकार परिषदेत उघडकीस आणले.

राहुल गांधी हिंदू आहेत की ख्रिश्चन यावरून याआधी देखील वादळ निर्माण झालं होतं. न्यूयॉर्क टाइम्सने राहुल गांधी  यांचं पालनपोषण सोनिया गांधी यांनी ख्रिश्चन रिवाजाप्रमाणे केल्याचा उल्लेख केला होता. यावर राहुल गांधी यांनी खुलासा केल्याचे ऐकीवात नाही, असे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी जाहीरपणे आपला धर्म सांगण्याचे आत्तापर्यंत टाळले आहे. त्यांचा दावा हा सेक्युलर आचारसरणीचा आहे, मात्र सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा धर्म कुठला यावर उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments