Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी,काँग्रेसची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी,काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली- काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्या प्रचार सभेत केलेल्या गुप्त बैठकीच्या विधानावर चांगलीच तोफ डागली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राजकीय नेते, अधिकारी आणि पत्रकारांनी कार्यक्रमानंतर घेतलेल्या भेटीला गुप्त म्हणत त्याचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी करणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे वक्तव्य असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच ज्या बैठकीत माजी लष्करप्रमुख उपस्थित राहतात ती बैठक गुप्त कशी होऊ शकते, असाही प्रश्न केला.

मोदींनी त्यांच्या प्रचारसभेत बोलताना काँग्रेसने पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत गुप्त बैठक केल्याचा आरोप केला होता. यामध्ये माजी परराष्ट्र मंत्री व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी उपस्थित होते व त्यांनी ३ तास चर्चा केल्याचा आरोप केला होता. याविषयी पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्याबद्दल केलेल्या बेजबाबदार वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, आजी माजी राजदूत, राजकीय नेते आणि पत्रकारांची उपस्थिती असलेल्या या बैठकीत काहीही गुप्त नाही. पंतप्रधानांची ही कृती अनावश्यक आणि बेजबाबदारपणाची असून त्यांनी यातून सनसनाटी पसरवत चुकीचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे मत काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
मोदींनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी जनतेला भ्रमित करण्यासाठी आणि दिशाभूल करण्याच्या उद्देशाने ही प्रतिक्रिया दिली आहे. भावनांचा आणि ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यासाठी हे केल्याचे स्पष्ट असल्याची भूमिका यावेळी काँग्रेसने घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments