नवी दिल्ली – भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज १०० वी जयंती. या पार्श्वभूमिवर माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी शक्ति स्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गांधी यांना आदरांजली वाहिली.
जयंतीच्या पार्श्वभूमिवर अलाहाबादमध्ये रविवारी ३३ वी अखिल भारतीय प्राइजमनी इंदिरा मॅरेथॉन आणि क्रॉस कंट्री शर्यत आयोजित केली आहे. या स्पर्धेत ११ हजार धावपटूंनी भाग घेतला. सकाळी ६.३० वाजता आनंद भवनपासून मॅरेथॉन आणि क्रॉस कंट्रीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तर दुपारी मदन मोहन मालवीय स्टेडियममध्ये खेळांडूंना सम्मानित करण्यात आले.
जवाहरलाल नेहरू आणि कमला नेहरू या दांम्पत्याच्या पोटी इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी नेहरु या राजकीय घराण्यात झाला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (१९ नोव्हेंबर १९१७ – ३१ ऑक्टोबर १९८४) या वर्ष १९६६ पासून १९७७ पर्यंत सलग ३ वेळा भारताच्या पंतप्रधान राहिल्या. ४ थ्या वेळी १९८० ते १९८४ पर्यंत त्या पंतप्रधान राहिल्या परंतू राजनैतीक हत्येमुळे त्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.